
Pune Ganpati Visarjan News : पुण्यात गणपती विसर्जनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. मुळशी परिसरात एका युवकाचा गणपती विसर्जनादरम्यान बुडला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता, त्यानंतर आज सकाळपासून शोधकार्य सुरूच आहे. पण अद्याप तुरूणाचा शोध लागला नाही. लक्ष्मण चव्हाण असे बुडालेल्या तरूणाचे नाव आहे. तो मूळचा लातूरमधील उदगीर तालुक्यातील आहे. मुळा नदीच्या किनाऱ्यावर ही दुर्घटना घडली. मित्रांसोबत गणेश विसर्जनाला गेला होता, त्यावेळी ही दुर्घटना घडली.
मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास, पिरंगुट- हिंजवडी मार्गावरील भरे पूल येथे मुळा नदीच्या किनारी ही दुर्घटना घडली. लक्ष्मण हा एका खाजगी हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून काम करतोय. विसर्जनासाठी मित्रांसोबत खोल पाण्यामध्ये गेला होता. त्या ठिकाणी पाण्यामध्ये त्यांनी डुबकी मारली, पण लक्ष्मण तसाच नदीच्या पात्रामध्ये वाहत खाली गेला. लक्ष्मण मूळचा उदगीर तालुक्यातील असून सध्या तो पिरंगुट येथे राहत होता. त्याचा शोध आपत्ती व्यवस्थापन समितीने घेत असताना संध्याकाळ झाल्याने शोध थांबवण्यात आला. आज सकाळपासून या बुडलेल्या मुलाचा शोध घेतला जात आहे.
अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन ग्रामीण पोलीस तपास करत आहेत. काल पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तसेच रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. बेपत्ता तरुणाचा आज सकाळी पुन्हा शोध घेतला जात आहे. पुण्यामध्ये मंगळवारी सात दिवसांच्या गणपीतीचे विसर्जन झाले. पुणेकरांनी लाडक्या बाप्पााला जड अंत:करणाने निरोप दिला. गणरायाला निरोप देण्यासाठी गेलेल्या लक्ष्मण चव्हाण हा तरूण पाण्यात वाहून गेलाय. त्याचा शोध अद्याप सुरू आहे. गणेश विसर्जनावेळी काळजी घेण्याचे आवाहन पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले



























Subscribe to my channel

