Ganeshotsav 2023 Rule: गणेशोत्सवात मनसोक्त नाचा; रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकरला परवानगी, वाचा संपूर्ण नियमावली

Ganeshotsav 2023 Rule Mannual : गणेशोत्सव म्हटलं की सर्वांच्याच अंगात मोठा उत्साह संचारतो. उत्साहात गणपती आगमन आणि विसर्जन केलं जातं. आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी नागरिक मोठा जल्लोष करतात. अशात अनेकजण डीजेच्या गाण्यांवर ताल धरत आनंद व्यक्त करतात. यंदा लाउडस्पीकरसाठी मोठी सूट देण्यात आली आहे.

Sharad Pawar: वाघ हा वाघ असतो, तो कधीच म्हातारा होत नसतो; शरद पवारांच्या सभेआधी जळगावात झळकले बॅनर्स

रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकर वाजणार

गणेशोत्सवादरम्यान यंदा ४ दिवस १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकरला परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सव समन्वय समिती अध्यक्ष नरेश दहिभावकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. दिड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान तसेच ५ व्या ९ व्या आणी अनंत चतुर्दशी दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकरला परवानगी देण्यात आली आहे.

बेवारस वाहन तसेच अनैतिक धंद्यांवर यंदा यंदा खीळ बसणार असं पालिका अधिकार्यांनी म्हटलं आहे. यासह विसर्जनादरम्यान ५ लाखांपेक्षा कमी नुकसान झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी देखील गणेश मंडळांच्या नियमावलीबाबत माहिती दिली आहे. कोणत्याही गणेश मंडळाकडून चार्जेस घेतले जाणार नाहीत. मोठ्या गणेश मंडळाना अग्निशमन दल व्यवस्था ठेवणे अनिवार्य होते त्यासाठी त्यांच्याकडून चार्जेस घेतले जात होते. ते माफ करणयची मागणी मान्य करण्यात आली आहे, असं केसरकर म्हणाले.

ज्या सूचना गणेश मंडळ समन्वय समितिने दिलाया आहेत. त्या जवळपास सर्व मान्य केल्या आहेत. गणपती विसर्जन आणि ईद मिरवणूक एकाच दिवशी आल्यामुळे पुण्यातील मुस्लिम समाजाने दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शासनाने याबाबत काही आदेश दिले नाहीयेत. पुण्यातील मुस्लिम समाजाने स्वतःहून हा निर्णय घेतला आहे, असंही केसरकर यावेळी म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply