Gadchiroli Rain : गडचिरोलीत मुसळधार पाऊस; पर्लकोटा नदीला पूर, 120 गावांचा तुटला संपर्क

Gadchiroli Rain : राज्यातील अनेक जिल्ह्यात वरुणराजा धुव्वाधार बॅटिंग करत आहे. गडचिरोली जिल्ह्यात कालपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आलाय. यामुळे १४ मार्गावरील वाहतूक ठप्प झालीय . तर भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्यातील 120 गावांचा संपर्क तुटलाय.

गेल्या २४ तासांत देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक १३७ मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. कुरखेडा तालुक्यात ११६.६ मिलिमीटर पाऊस पडला. पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणीवाहू लागल्यांने तेथे बरिकेट लावून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.पुरामुळे आलापल्ली-भामरागड, भामरागड-एटापल्ली अहेरी-मोयाबीनपेठा, कुरखेडा-चारभट्टी, आलापल्ली-सिरोंचा, जारावंडी ते पाखांजूर, पोर्ला-वडथा, वैरागड-शंकरपूर, कुरखेडा-वैरागड, कारवाफा-पोटेगाव, मालेवाड़ा-खोब्रामेंढा, गोठणगाव-सोनसरी, देसाईगंज-आंधळी, लखमापूर बरी-गणपूर या १४ मागवरील वाहतूक ठप्प झालीय.

Mumbai : ग्रँड रोड स्टेशन परिसरातील इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी-नाल्यासह धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालीय. आमगाव आणि सालेकसा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पुजारीटोला हे धरण तुडुंब भरलंय. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्याकरिता धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून २९७० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूय. त्यामुळे बाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply