Gadchiroli : न्यायाधीशांशी हुज्जत घालणे पडले महागात; पोलीस निरीक्षकांचं निलंबन

Gadchiroli : आपल्याविरुद्ध निकाल देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यावरून न्यायाधीशांच्या घरी जाऊन हुज्जत घालणे पोलिस निरिक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. चामोर्शी येथील पोलीस निरीक्षक असलेले राजेश खांडवे यांना गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी निलंबित केले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू....

याबाबत अधिक माहिती अशी की, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी दरम्यान माजी सभापती अतुल पवार यांना पोलीस निरीक्षकांकडून बेदम मारहाण झाली होती. या प्रकरणी चामोर्शी येथे राजेश खांडवे यांच्याविरुद्ध मोठे आंदोलन झाले. 

यासंदर्भात अतुल पवार यांनी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्याविरुद्ध चामोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली नाही. या विरोधात अतुल पवार यांनी चामोर्शी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली.

प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मेश्राम यांनी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर कलम 294, 324, 326 अन्वये गुन्हा नोंदवण्याचे आदेश 20 मे रोजी दिले होते. या प्रकरणी राजेश खांडवे गुरुवारी न्यायाधीश मेश्राम यांच्या बंगल्यावर पोचून त्यांच्याशी हुज्जत घातली.

न्यायाधीशांनी ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षकांना अवगत करून गडचिरोली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणाची पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेत राजेश खांडवे यांना निलंबित केले आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply