G20 Summit 2023 : काश्मीरमध्ये आज G-20 परिषद; विमानतळापासून शहराच्या कानाकोपऱ्यात सुरक्षारक्षक तैनात

G20 Summit 2023 : जम्मू- काश्मीर येथे आजपासून G-20 ची महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे. श्रीनगरमध्ये होणाऱ्या या बैठकीपूर्वी आंतरराष्ट्रीय सीमेवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर जबरवान हिल्स ते श्रीनगरच्या डल लेकपर्यंत सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरमधून ३७०  कलम हटवल्यानंतर आज पहिल्यांदाच येथे मोठा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम होत आहे.

६० हून अधिक प्रतिनिधी सहभागी

G-20 च्या आज होणाऱ्या बैठकीत ६० हून अधिक व्यक्ती सहभागी होणार आहेत. सुरक्षेच्या दुष्टीने जल, आकाश आणि जमीन अशा सर्वच ठिकाणांहून सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. एनएसजीची ड्रोन रोधी टीम येथे तैनात करण्यात आल्या आहेत. नौसेनेचे कमांडो समुद्र मार्गांवर आपला तळ ठोकून आहेत. तसेच संपूर्ण शहरात देखील प्रत्येक रस्त्यावर सुरक्षारक्षक उभे आहेत.

G20 च्या आज होणाऱ्या भव्य कार्यक्रमात कोणतीही बाधा येऊनये यासाठी अशा प्रकारचा बंदोबस्त करण्यात आलाय. तसेच या बैठकीसाठी संपूर्ण शहर सजवण्यात आलं आहे. रस्त्यांवर जागोजागी पोस्टर लावण्यात आलेत. यासह येथील भींतीवर G20 चे लोगो देखील लावण्यात आले आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलीट एनएसजी आणि मरीन कमांडो कार्यक्रम स्थळी पोलीस देखील सैनिकांच्या मदतीला आले आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आहे. येथून येणाऱ्या जाणाऱ्या सर्वच वाहनांची चौकशी केली जात आहे. चौकशी केल्याशिवाय कोणतेही वाहन पुढे जाऊ दिले जात नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply