G20 Summit : परदेशी पाहुण्यांसाठी उभारला 'Ask GITA' एआय चॅटबॉट! भगवद्गगीतेच्या आधारे देणार प्रश्नांची उत्तरं

G20 Summit : सध्या राजधानीमध्ये जी-20 परिषदेच्या बैठकीची जोरात तयारी सुरू आहे. यासाठी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सोबतच या बैठकीसाठी येणाऱ्या विदेशी पाहुण्यांसाठी कित्येक खास गोष्टीही तयार करण्यात आल्या आहेत.

9 आणि 10 सप्टेंबर रोजी ही बैठक पार पडणार आहे. यासाठी कित्येक देशांचे अध्यक्ष, राष्ट्रपती आणि पंतप्रधान दिल्लीमध्ये येतील. त्यांच्यासोबतच त्यांचे शिष्टमंडळही असणार आहे. या पाहुण्यांसाठी 'भारत मंडपम' मध्ये एक एआय चॅटबॉट देखील उभारण्यात आला आहे.

G-20 Summit : जी-२० परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन; अंबानी, अदानींसह ५०० जणांना निमंत्रण

काय आहे Ask GITA?

ASK G.I.T.A. हा एक हायटेक एआय चॅटबॉट आहे. या चॅटबॉटला एखाद्या व्यक्तीने काही प्रश्न विचारल्यास, त्यांची भगवद्गीतेच्या आधारे उत्तरं देण्यात येतील. "यश कसं मिळवावं?", "आयुष्यात आनंदी कसं रहावं?" अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही या चॅटबॉटला विचारू शकता. भगवद्गीतेमध्ये दिलेल्या उपदेशांनुसार यांची उत्तरं हा चॅटबॉट देईल. ही उत्तरं हिंदी आणि इंग्रजीमध्ये असणार आहेत.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. भारत मंडपम मधील 4 आणि 14 नंबरच्या हॉलमध्ये हा चॅटबॉट असणार आहे.

डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन

प्रगती मैदानावर असणाऱ्या भारत मंडपम मध्ये विशेष 'डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन' तयार करण्यात आला आहे. यामध्ये 2014 नंतर भारताने डिजिटल क्षेत्रात केलेल्या प्रगतीची माहिती देण्यात येईल. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाची ही संकल्पना आहे. परदेशी पाहुण्यांसमोर भारतात असणाऱ्या तंत्रज्ञानाची झलक दाखवणं हा यामागचा उद्देश्य आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply