Free Ration : "ज्यांनी मतदान केले नाही त्यांना रेशन देऊ नये," मुंबईतील भाजप नेत्याची मोदींकडे मागणी

Free Ration : देशात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपला महाराष्ट्रात जबरदस्त धक्का बसला आहे. अशात महाराष्ट्र भाजपचे उत्तर भारतीक आघाडीचे उपाध्यक्ष अर्जुन गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात अर्जुन गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले की, "ज्या लोकांनी मतदानाचा हक्क बजावला फक्त त्याच लोकांना मोफत रेशन देण्यात यावे. जे लोक लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले नाहीत अशांना मोफत रेशन देणे बंद केले पाहिजे. मतदान करणाऱ्याऱ्यांनाच मोफत रेशन मिळावे, मग त्यांनी कोणत्याही पक्षाला मत दिले तरी हरकत नाही."

Pune : ‘टोइंग’च्या सरसकट भुर्दंडातून सुटका, कारवाईच्यावेळी वाहनचालक उपस्थित असल्यास केवळ ‘नो-पार्किंग’चा दंड

 


भाजप नेत्याने पत्रात लिहिले आहे की, तुमच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक नेता बनण्याच्या तयारीत आहे. गेल्या 60 वर्षापासून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केवळ मतांसाठी जनतेला मूर्ख बनवले आहे. तुमच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या विकासाबद्दल संपूर्ण जग बोलत आहे. असे असतानाही फार कमी लोकांनी मतदान केले. कमी मतदानामुळे आमच्यासारख्या कार्यकत्यांचे मनोधैर्य खचले आहे. त्यामुळे मोफत रेशन बंद करावे.
महाराष्ट्रात भाजपने शिंदे गटाच्या शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्र‌वादी काँग्रेससोबत आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवली होती. पक्षाचे येथे मोठे नुकसान झाले. भाजपला लढवलेल्या 28 जागापैकी केवळ 9 जागा जिंकता आल्या. तर शिंदे गटाच्या शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली.

दुसरीकडे महाविकास आघाडीने 30 जागी विजय मिळवला. यात काँग्रेसला सर्वाधिक 13, ठाकरेंच्या शिवसेनेला 9 आणि पवारांच्या राष्ट्र‌वादीला 8 जागा मिळाल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply