Fraud : शेतकऱ्यांच्या नावावर लोन काढून फसवणूक; जय किसान मशीनरीच्या संचालकावर गुन्हा दाखल

Jalna : जालन्यातील परतुर येथे शेतकऱ्यांच्या नावावर नेटाफेम कंपनीचे लोन करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या नावाने कोठ्यावधीचे लोन काढत फसवणूक झाली आहे. याप्रकरणी परतुर येथील जय किसान मशिनरीचे संचालक संदीप जगताप यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

 

जालना जिल्ह्यातील परतूर येथील जय किसान मशिनरी हे शेतीसाठी उपयुक्त असलेली मशिनरी तयार करते. यामुळे या कंपनीशी अनेक शेतकरी जुळलेले आहेत. दरम्यान कंपनीचे संचालकाने शेतकऱ्यांशी असलेल्या संपर्क याचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांच्या नावाने नेटाफेम कंपनीकडून परस्पर लोन काढून घेतले होते. याबाबत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकरणी कल्पना नव्हती. मात्र लोनबाबत शेतकऱ्यांना समजताच शेतकरी संतप्त झाले होते.

एक कोटी रुपयांची फसवणूक

जालन्यात घडलेल्या या प्रकारात आतापर्यंत जवळपास एक कोटी रुपयांची शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या नावाने लोन काढून फसवणूक झाल्याने शेतकरी संतप्त झाले होते. या प्रकरणी संशयित आरोपी संदीप जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तडीपारची कारवाई करा अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.

Pushpak Express Accident : जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आखडा १३ वर, 7 जणांची ओळख पटली; पाहा मृतांची यादी

शेतकऱ्यांनी उपोषणाचा दिला इशारा

इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची झालेली फसवणुकीने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान जय किसान मशिनरीचे संचालक असलेले संशयित आरोपी संदीप जगताप याला तात्काळ अटक करून तडीपार करण्याची मागणी करण्यात आली आहे. असे न केल्यास २६ जानेवारीपासून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

संशयीताविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तीन गुन्हे

जालन्यातील परतूर येथील नेटाफेम कंपनीचे लोन करून शेतकऱ्यांच्या सातबारा बोजा टाकल्याची घटना समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संदीप जगताप यांच्या विरोधात परतुर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी देखील संदीप जगताप याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये तीन फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply