Fireworks Seized : चीनमधून आणलेले ११ कोटींचे फटाके जप्त, न्हावा शिवा येथे कस्टम विभागाची कारवाई

Fireworks Seized : JNPT च्या न्हावा शेवा येथे सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. 'मॉप रॉड आणि ब्रश क्लीनर' असल्याचं भासवून प्रतिबंधित फटाक्यांची तस्करी करणाऱ्या दोन कंटेनर जप्त करण्यात आले आहेत.सीमाशुल्क विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली आहे. यामध्ये तब्बल 11 कोटी रुपयांचे 40 मेट्रिक टन प्रतिबंधित  चिनी फटाके जप्त करण्यात आले आहेत.

सीमाशुल्क नियमांनुसार, फटाक्यांची आयात करण्यावर बंदी आहे. फटाके आयात करण्यासाठी डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडकडून परवानगी घ्यावी लागते. रेड लीड आणि लिथियम सारख्या विषारी रसायनांसह निकृष्ट दर्जाच्या विदेशी फटाक्यांचा ओघ रोखण्यासाठी हा परवाना आवश्यक करण्यात आला आहे.

Buldhana News : प्रवासादरम्यान लक्झरी बसमधून ६० लाख रुपयाची चोरी; आरोपीला ४९ लाख रकमेसह अटक

 दोन कंटेनरमधून अवैध मालाची तस्करी केली जात असल्याचा संशय कस्टम अधिकाऱ्यांना आला. त्यानंतर अधिकाऱ्यांना कंटेनर थांबवून त्याची तपासणी केली. त्यावेळी कंटेनरमध्ये चीनमधून आयात केलेल्या मॉप्स आणि ब्रशेस असल्याचं सांगण्यात आलं. मात्र कंटेनरची तपासणी केला असता त्यामध्ये प्रतिबंधित फटाके असल्याचं उघड झालं. 

डीजीएफटीकडून आयात परवाना मिळवण्याची प्रक्रिया कठीण आहे. त्यामुळे ही प्रक्रिया टाळून अवैध मार्गाने हे फटाके आणण्यात आले होते. सण आणि लग्नाच्या हंगामात या फटाक्यांची मोठी मागणी असते. ती पूर्ण करण्यासाठी आयातदार परदेशी मूळ फटाक्यांची तस्करी करतात, असं एका कस्टम अधिकाऱ्यांने सांगितलं. जप्त केलेले फटाके पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन कडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply