FDA Raid : २ लाखांचा गुटखा जप्त; अन्नसुरक्षा विभागाची कार्यवाहीत ३ जणांना अटक

FDA Raid :  नंदुरबार शहरात अन्नसुरक्षा विभाग नाशिक यांच्यातर्फे बेकायदेशीररित्या महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंद असलेला तंबाखू युक्त संबंधित पान मसाला, गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली. नंदुरबार शहरातील तीन ठिकाणी धाडी टाकत सुमारे २ लक्ष ४६ हजार ९६६ रुपयांच्या मुद्देमालासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंद असलेल्या तंबाखू युक्त पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, करमचंद पान मसाला या तंबाखूयुक्त सुगंधित पान मसाला विक्रीवर बंदी आहे. तरी देखील याची सर्रासपणे विक्री केली जात आहे. अशा प्रकारे बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्यांवर अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार कारवाई करण्यात आली. नंदुरबारमध्ये येत नाशिकच्या पथकाने तीन ठिकाणी धड टाकून कारवाई केली आहे. 

Raigad Accident : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; २ जण गंभीर जखमी

नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात संबंधित विक्रेत्यांविरुद्ध नंदुरबार अन्नसुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी फिर्याद दाखल केली असून संबंधितांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. त्यात अनिल दिलीप चौधरी, जगदीश कायस्थ तसेच रोहित संजय चौधरी यांना यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाईसाठी अटक करण्यात आली असल्याची माहिती अन्नसुरक्षा विभागाकडून देण्यात आली आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply