Fake Doctor : नागरिकांनो सावधान! उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, १८ दवाखान्यांना ठोकलं टाळं

Fake Doctor : उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असून १८ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांकडून कारवाईत सहकार्य मिळत नसल्याचा महापालिकेचा आरोप आहे. उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

उल्हासनगरमध्ये १८ बोगस डॉक्टरांवर महापालिकेने कारवाई केली. या डॉक्टरांचे दवाखाने सील करण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उल्हासनगर शहरात २६ बोगस डॉक्टर्स असल्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला मिळाली होती. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी शहरातील या डॉक्टरांच्या दवाखान्यांची झाडाझडती घेतली. यामध्ये १८ डॉक्टर दवाखाने चालवत असल्याचे आढळून आले.

Disha Salian Case : दिशा सालियनवर बलात्कार झाला नव्हता, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

उल्हासनगरमध्ये ४ डॉक्टरांचे दवाखाने आढळून आले नाहीत. ३ डॉक्टरांची मेडिकल काऊन्सिलकडे नोंदणी असून १ डॉक्टर केडीएमसी हद्दीतला आहे. या प्रॅक्टिस करताना आढळलेल्या १८ डॉक्टरांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करत त्यांचे दवाखाने सील करण्यात आले आहेत. हे दवाखाने सील केले असताना देखील पुन्हा सुरू करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

बोगस डॉक्टरांच्या दवाखान्यांवर कारवाई करून देखील महापालिकेच्या पथकाची पाठ फिरताच हे डॉक्टर पुन्हा दवाखाने सुरू करत असल्याचे आढळलं असून पोलिसांकडून त्यांच्यावर वचक ठेवणं गरजेचं आहे. परंतु पोलिस याबाबतीत योग्य सहकार्य करत नसल्याचा आरोप उल्हासनगर महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी केला आहे. अशामध्ये उल्हासनगरमधील नागरिकांनी कोणत्याही दवाखान्यात जाण्यापूर्वी त्याठिकाणी असणाऱ्या डॉक्टरकडे सर्टिफिकेट आहे की नाही ते आधी तपासा असे आवाहन केले जात आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply