Fake Currency :1 लाख रुपयांच्या बदल्यात 6 लाखांच्या नोटा; नंदुरबार आणि कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट


Fake Currency : राज्यात बनावट नोटांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. नंदुरबार आणि कोल्हापूरमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पदार्फाश झालाय. गुन्हे शाखेने कारवाई करत १ लाख ८० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. नंदुरबारमध्ये १ लाख रुपयांच्या असली नोटांच्या बदल्यात ६ लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचं आमिष दाखवत लुटणाऱ्यांचा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

तर कोल्हापुरात करवीर पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना अटक केलीय. हाँगकाँगमधील हाय सिक्युरिटी थ्रेडचा कागद मागवून बनावट नोटा छापणारा आणि चलनात आणणाऱ्या दोघांना करवीर पोलिसांनी अटक केलीय. सिद्धेश घाटगे आणि विकास पानारी अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. यांच्याकडून बनावट नोटा, बनावट नोटा छापलेले प्रिंटर्स पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपींना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलेत.

केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेला घाटगे हे घरी बनावट नोटा छापत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी गोपनीयपणे सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी घाटगे याने बाहेरील देशातून साधनसामग्री मागवून बनावट नोटा छापत होते. त्यांना अटक करून त्यांच्याकडील ए फोर साइझचे चार पेपर, पन्नास रुपयांच्या सहा बनावट नोटा, २०० रुपयांच्या चार बनावट नोटा, ५०० रुपयांच्या चार बनावट नोटा, कोऱ्या कागदावर हाय सिक्युरिटी थ्रेड असलेली रंगीत पट्टी त्यावर आरबीआय आणि भारत असे छापलेले कागद जप्त करण्यात आले.

Corona Virus : चीनमध्ये नवा व्हायरस, जगाला पुन्हा धडकी, भारतात लॉकडाऊन लागणार का?

घाटगे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर बनावट नोटा चलनात आणणारा विकास पानारी यालाही पोलिसांनी अटक केली. काही तरुण कळंब्यात बनावट नोटा छापण्याचे काम करतात आणि त्याची माहिती थेट केंद्रीय तपास यंत्रणेपर्यंत पोहोचते आणि स्थानिक पोलिसांना त्याचा काहीच सुगावा लागत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून नंदुरबार जिल्ह्यात बनावट नोटांचा सुळसुराट सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत जप्त केले १ लाख ८० रुपयांचे बनावट नकली नोटा जप्त केल्या आहेत. ज्यांना अटक करण्यात आलीय, ते १ लाख रुपयांच्या असली नोटांचा बदल्यात ६ लाखांचे बनावट नोटा देत होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत १ लाख ८० रुपयांच्या बनावट नकली नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी बनावट नोटांचे ३ बंडल पोलिसांनी जप्त केले आहेत. बनावट नोटा देऊन लुटण्याच्या प्रयत्नात आलेल्या दोन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply