Fadnavis Convocation Ceremony : जपानकडून देवेंद्र फडणवीसांचा मोठा सन्मान; कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान

Fadnavis Convocation Ceremony : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपानमधील विद्यापीठाच्यावतीने गौरव करण्यात आलाय. जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आला. कोयासन विद्यापीठाच्या १२० वर्षाच्या इतिहासात मानद डॉक्टरेट प्राप्त करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिले आहेत.देवेंद्र फडणवीस  हे ऑगस्टमध्ये जपान दौर्‍यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती. देवेंद्र फडणवीस हे २०१५ मध्ये जपान दौर्‍यावर गेले होते. त्यावेळी कोयासन विद्यापीठात त्यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यानंतर २०१८ आणि २०२३ मध्ये त्यांनी जपानला भेट दिली होती.

Pune Crime News : पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुडगूस; मध्यरात्री २०- २५ वाहनांची तोडफोड, परिसरात खळबळ

डॉक्टरेट मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जपानी भाषेत विद्यापीठाचा गौरवोद्गार काढले. मला अतिशय आनंद आहे, की मी दिक्षा भूमीच्या शहरातून येतो. कोयासन विद्यापीठाने मला डॉक्टरेट पदवीने जो बहुमान दिला आहे त्याबाबत मी मनापासून आभार मानतो. २०१५ साली जपानमधील विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापित करता आला.

जपान आणि महाराष्ट्राची भारताची मैत्री वेगळी आहे. जपाने सातत्याने महाराष्ट्राला आणि भारताला मदत केली आहे. जपान आपला अतिशय जवळचा मित्र आहे. हा बॉन्ड केवळ मैत्रीचा नाही, तर सांस्कृतिक कडी आहे ती म्हणजे भगवान गौतम बुद्ध. ते दोन्ही देशाला जवळ आणतो.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply