Shaitaan box office collection day 1 : अजय आणि आर. माधवनच्या 'शैतान'चा बॉक्स ऑफिसवर जलवा; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

Shaitaan box office collection day 1: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा शैतान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची अजयनं निर्मिती केली आहे, तसेच या चित्रपटात त्यानं काम देखील केलं आहे. शैतान या चित्रपटात आर. माधवननं खलनायकाची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील आर. माधवनच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत..

sacnilk या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, शैतान या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 14.50 कोटींची कमाई केलेली आहे. याचा अर्थ ओपनिंग-डेला शैतान या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल, असा अंदाज लावला जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'शैतान' हा चित्रपट 60 ते 65 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. अशातच आता हा चित्रपट दुसऱ्या दिवशी किती कमाई करतो? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Sangli News : दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा पहिला निर्णय आमच्या सरकारनं घेतला : मुख्यमंत्री

भोला आणि ड्रीम गर्ल-2 चा रेकॉर्ड तोडला

अजय देवगणच्या 'भोला' आणि आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटांचा रेकॉर्ड शैतान या चित्रपटानं मोडले आहेत. 'भोला' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 11.20 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 10.69 कोटी रुपयांची कमाई केली होती.

'वश'चा रिमेक

'शैतान' हा चित्रपट 'वश' या गुजराती चित्रपटाचा रिमेक आहे. वाश हा कृष्णदेव याज्ञिक दिग्दर्शित चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता.

चित्रपटाचे कथानक

'शैतान' या चित्रपटाचे कथानक हे काळी जादू, वशीकरण यावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहलनं केलं आहे. सिनेमाचे कथानक एका कुटुंबावर आधारित आहे. कबीर, ज्योती आणि त्यांची दोन मुलं हे एका फार्म हाऊसमध्ये जातात. फार्म हाऊसमध्ये जात असतानाच वाटेत त्यांना वनराज भेटतो. कबीरची मुलगी जान्हवीला वनराज हा वशमध्ये करतो. पुढे काय घडतं? हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल.

'शैतान' या चित्रपटातील ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. ट्रेलरमधील आर. माधवनच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply