Maidaan Trailer : भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ केला जिवंत, अजय देवगणच्या 'मैदान'चा रोमांचक ट्रेलर रिलीज

Maidaan Trailer :बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा  'शैतान' चित्रपट  नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला पहिल्या दिवशीच प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. शैतान चित्रपटानंतर आता अजय देवगणचा बहुप्रतीक्षित 'मैदान' चित्रपट  रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे. अशामध्येच निर्मात्यांनी मैदानचा धांसू ट्रेलर रिलीज केला आहे. अतिशय रोमांचक आणि थ्रिलने भरलेल्या या ट्रेलरला  प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे.

मैदान चित्रपटात अजय देवगण भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. ज्यामध्ये 1952 ते 1962 पर्यंतच्या दौऱ्याची कथा पडद्यावर दाखवली जाणार आहे. निर्माता-दिग्दर्शक हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर म्हणजे एप्रिल महिन्यात प्रदर्शित करणार आहेत. नुकताच रिलीज झालेला मैदानचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Pune Crime News : गुंड टोळक्याकडून दहशत पसरवत कोयत्याने हल्ला, तिघेजण जखमी

फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित अजय देवगण स्टारर मैदान चित्रपट त्यांच्या फुटबॉलसाठीच्या संघर्षाची कहाणी सांगतो. सय्यद अब्दुल रहीम यांना भारतातील सर्वात क्रांतिकारी फुटबॉल प्रशिक्षक मानले जात होते. या चित्रपटाची कथा क्रीडाप्रेमी प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. चित्रपटाला ज्येष्ठ संगीतकार ए.आर.रहमान यांनी संगीत दिले आहे दिली आहे. ईदच्या मुहूर्तावरच हा चित्रपट रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी तयार केला आहे. त्यामुळेच या चित्रपटाची मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे.

अजय देवगण सध्या त्याच्या करिअरच्या सर्वोत्तम टप्प्यावर आहे. अजय देवगणच्या हातामध्ये यावर्षी ३ चित्रपट आहेत. 'मैदान'पूर्वी अजय देवगणचा 'शैतान' आज रुपेरी पडद्यावर रिलीज झाला. यानंतर 'मैदान' ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. त्यानंतर अजय देवगण हा रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या कॉप युनिव्हर्स चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय अजय देवगणच्या हातामध्य आणखी काही चित्रपट आहेत. सध्या तो या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply