T20 World Cup : गतविजेता इंग्लंड विजयी सलामीसाठी सज्ज! स्कॉटलंडकडून धक्कादायकनिकालाची अपेक्षा

England vs Scotland T20 World Cup 2024 : गतविजेता इंग्लंडचा क्रिकेट संघ आज टी-२० विश्वकरंडकातील 'ब' गटातील सलामीच्या लढतीत स्कॉटलंडचा सामना करणार आहे. पहिल्या लढतीत विजय मिळवून स्पर्धेचा श्रीगणेशा शानदार करण्यासाठी त्यांचा संघ प्रयत्नशील असेल. स्कॉटलंडचा संघ मात्र सलामीच्याच लढतीत इंग्लंडला पराभवाचा धक्का देण्यासाठी सरसावला असेल.

टी-२० विश्वकरंडकाआधी इंग्लंड-पाकिस्तान यांच्यामध्ये चार टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. ही मालिका टी-२० विश्वकरंडकाची सराव स्पर्धा म्हणून खेळवण्यात आली. मात्र यामधील दोन सामने पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानसह इंग्लंडच्या खेळाडूंनाही मनाजोगता सराव करता आला नाही. मात्र इंग्लडच्या काही क्रिकेटपटूनी आयपीएलमध्ये खेळून टी-२० क्रिकेटचा सराव करवून घेतला आहे.

Ind Vs Ire T20 WC24 : 5 जूनला भारत-आयर्लंड सामना पावसामुळे रद्द तर... कोणाला होणार फायदा?

 

जौस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडने २०२२ मध्ये दुसन्यांदा टी-२० विश्वकरंडक पटकावला होता, पण त्यानंतर इंग्लंडच्या संघाला सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. मागील वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडकात इंग्लंडची सातव्या स्थानावर घसरण झाली. वेस्ट इंडीजकडून त्यांना दोन्ही प्रकारांत (एकदिवसीय व टी-२०) पराभवाला सामोरे जावे लागले.

सुखद आठवणी

इंग्लंडच्या संघाने २०१० मध्ये ब्रिजटाऊनमधील केनसिंग्टन ओव्हल या स्टेडियममध्ये पहिल्यांदा टी-२० विश्वकरंडक जिंकण्याची किमया केली होती. आता यंदाच्या स्पर्धेतील पहिला सामनाही त्याच मैदानावर होणार आहे. इंग्लंडचा संघ २०१० ची सुखद आठवण घेऊन मैदानात उतरू शकतो.
आर्चर, बुककडून अपेक्षा

जॉस बटलर, सॅम करन, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, फिल सॉल्ट या इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी आयपीएलमधील विविध संघांमधून खेळण्याचा अनुभव मिळवला आहे. त्यामुळे टी-२० क्रिकेटचा चांगला सराव त्याच्याकडून करण्यात आला आहे, पण इंग्लंडच्या संघात दोन खेळाडू असे आहेत, की बऱ्याच दिवसांनंतर ते क्रिकेटच्या रणांगणात उतरत आहे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर व युवा फलंदाज हॅरी बुक ही त्यांची नावे. या दोनही खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता, पण टी-२० विश्वकरडक देशाचे प्रतिनिधित्व करताना कस लागतो. त्यामुळे दोघांकडून आता मोठ्या अपेक्षा बाळगल्या जातील.

पात्रता फेरीत घवघवीत यश

स्कॉटलंडचा संघ इंग्लंडच्या तुलनेत दुबळा समजला जात असला तरी जॉस बटलरच्या संघाने त्यांना कमी लेखून चालाणार नाही. स्कॉटलंडच्या संपाने टी-२० विश्वकरंडकाच्या पात्रता फेरीतील सहाही लढतीमध्ये विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला हे विशेष. या वेळी पात्रता फेरीतील घवघवीत यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी स्कॉटलंड्या सप प्रयत्न करताना दिसणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply