Emergency Helpline For Govinda's: दहीहंडीतील जखमी गोविंदांसाठी हेल्पलाइन जारी, 'या क्रमांकांवर साधा संपर्क

 

Helpline for injured Govinda's : देशभरात आज मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी केली जात आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि परिसरात दरवर्षी दहीहंडी धुमधडाक्यात साजरी केली जाते. इथे गोविंद पथके मोठमोठे थर लावत विश्वविक्रमही रचतात. अशात या उत्सवादरम्यान गोविंदा मोठ्या प्रमाणात जखमी होतात. यापूर्वी थरावरुन खाली पडल्याने काही गोविंदांना अपगंत्व तर काहींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत...

ही परिस्थिती लक्षात घेत डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाने जखमी गोविंदांसाठी इमर्जेंसी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
इथे साधा संपर्क

यासाठी कोणत्याही गोविंदाला ऑथपिडिक किंवा मेंदूला दुखापत झाल्यास तात्काळ वैद्यकीय मदत आणि रुग्णवाहिका सेवांसाठी आपत्कालीन हेल्पलाइन नंबर 7506274959 वर कॉल करण्याचे आवाहन एम्सने केले आहे.

Laser Lights Ban: पुण्यात पुढील ६० दिवस उत्सवात लेझर, बीम लाइट बंद; पोलिसांकडून परिपत्रक जारी

दहीहंडी उत्सवात लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्व वयोगटातील गोविंदा सहभागी होतात. या दरम्यान अनपेक्षितपणे थरुवारून खाली पडल्याने आणि चेंगराचेंगरीमुळे गोविंदांना मेंदूच्या दुखापती (TBIs) होतात. यामुळे ते कोमात जाण्याची शक्यता, अर्धागवायू, फेफरे, रक्तवाहिन्याचे नुकसान, चक्कर येणे आणि स्मृती जाणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
मुंबई आणि परिसरात दहीहंडीला दणक्यात सुरूवात

मुंबई आणि ठाणे परिसरात प्रसिद्ध असलेल्या दहीहंड्याना काहीवेळापूर्वी सुरुवात झाली असून, मुंबईकरामध्ये याबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आज मुंबई परिसरातील विविध दहीहंड्यांना उपस्थित राहणार आहेत. तर भाजपने ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात कमळ दहीहंडीचे आयोजन केले आहे.

दरम्यान भांडुपमध्ये मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडीत जय जवान पथकाने नऊ थरांची सलामी दिली आहे. मनसेचे मोहन चिरात यांनी या दहीहंडीचे आयोजन केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply