Eknath Shinde : महसुली नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Eknath Shinde : मराठा आरक्षणावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंथन झाल्याची माहिती आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी महसुली नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले मिळणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'जालना येथे उपोषण सुरू केल्यानंतर त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन किंबहुना त्यांची जी मागणी होती. ज्या जुन्या नोंदी ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी दाखला दिला पाहिजे, अशी मागणी होती'.

'आज या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला. त्यांना कुणबी दाखले दिले जातील. त्यासाठी कार्यपद्धती आहे किंबहुना हे देखील करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची एक समिती असेल. ज्या नोंदी पूर्वीच्या महसुली शैक्षणिक निजामकालीन आहेत, याची तपासणी करणं पडताळणी करणं एसओपी तयार करणं ही, समिती काम करेल. त्यांना अन्य समिती मदत करेल. एका महिन्यात अहवाल सादर करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले .

Pune Dahi Handi 2023 : दहीहंडी उत्सवामुळं पुण्यातील वाहतुकीत बदल; जाणून घ्या कोणत्या मार्गानं कसं आणि कुठे जाल?

'महसुली नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले जीआर देखील काढला जाईल. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती असेल. मनोज जरांगे पाटील यांनी गेली अनेक वर्षे आंदोलने केली आहेत. मी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. आतादेखील त्यांच्याशी बोललो. यामध्ये मार्ग काढूया. सरकार सकारात्मक आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिलं, असं शिंदे म्हणाले.

'मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द झालेला आहे. आरक्षण पुन्हा मिळवून देण्याची जबबादारी सरकारची आहे. आम्ही कटिबद्ध आहोत. सुप्रीाम कोर्टानं त्रुटी आपल्या निर्णयात दाखवलेल्या आहेत. मराठा समाज मागास, सामाजिक आर्थिक मागास आहे, जसं सादर करायला हवं होत. ते तेव्हा झालं नाही. जे आज टीका करतात त्यांच्यामुळे हे आरक्षण टिकलं नाही. जी काय प्रक्रिया करायची आहे. न्यायालयीन वैगेरे सरकारच्या माध्यमातून केले जाईल, असेही शिंदे पुढे म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply