Eknath Shinde : 'आजचा दिवस ऐतिहासिक; शिवरायांसमोर घेतलेली शपथ पूर्ण...' मुख्यमंत्री शिंदेंकडून जरांगे पाटलांचे कौतुक

Eknath Shinde : मराठा समाजाचा प्रदीर्घ काळ चाललेला आरक्षणाचा लढा अखेर संपला असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आले आहे. सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून तसा जीआर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. या विजयानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवरायांसमोर घेतलेली शपथ पुर्ण केली, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

"या आंदोलनाकडे सर्वांचेलक्ष लागले होते. आपली एकजुट आपण कायम ठेवली. अतिशय संयम आणि शिस्तीने आंदोलन पुर्ण केलं. कुठेही गालबोट न लावता हे आंदोलन यशस्वी केलं. कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. मराठा समाजासाठी न्याय मागणाऱ्या मनोज जरांगे पाटीलयांचे कौतुक," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Maratha Andolan Victory : अखेर जरांगे पाटील यांनी आंदोलन घेतलं मागे; उपोषण सोडून CM शिंदेंच्या हस्ते जीआर स्वीकारला

"मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आपले सरकार घेणारे नाही तर देणारे सरकार आहे. मी दिलेला शब्द पाळला. शिवरायांसमोर घेतलेली शपथ पुर्ण केली, आम्ही दिलेला शब्द पाळतो," असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

"आज गुलाल उधळण्याचा दिवस आहे. मराठा बांधवांच्या सर्व मागन्या मान्य केल्या आणि केवळ तुमच्या प्रेमापोटी इथे आलो. मराठा समाज म्हणत होता की कुणाच्या ताटातील नको, आमच्या हक्काचं हवं आहे. त्याचप्रमाणे आपण आरक्षण दिले," असे मुख्यमंत्र्यांनी नमुद केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply