ED Raids : अकोल्यासह मध्यप्रदेशात अनेक भागात ईडीची छापेमारी, 'या' कंपनीने केली ३ बॅंकाची १०९.८७ कोटींची फसवणूक

ED Raids : मेसर्स नारायण एक्सपोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मोठी फसवणूक केली आहे. तब्बल तीन बँकांची १०९.८७ कोटींनी ही फसवणूक केली  आहे. 

मेसर्स नारायण एक्सपोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं ज्या कारणासाठी कर्ज घेतलं होतं, त्यावर पैसे खर्च केले गेले नव्हते. याशिवाय कर्जाची परतफेड देखील केली नाही. त्यामुळे या प्रकरणी भोपाळ येथे कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

Madhya Pradesh Crime News : १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, पुलावरून ढकललं; पीडितेची मृत्यूशी झुंज

एकूण ११ ठिकाणी ईडीची छापेमारी

वसुली संचालनालयाने (ईडी) मध्य प्रदेशातील इंदोर, जौरा, मंदसौरसह महाराष्ट्र राज्यातील अकोल्यात एकूण ११ ठिकाणी छापेमारी  केली आहे.

छापेमारी दरम्यान संशयास्पद व्यवहारांची कागदपत्रे, स्थावर मालमत्ता ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे. दरम्यान ३१ जानेवारी रोजी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कंपनीच्या आर्थिक व्यवहारात गुंतागुंत

कंपनीने ज्या कारणांसाठी कर्ज घेतलं होतं, त्यासाठी त्याचा वापर केलेला नाही. कर्जाच्या रकमेचा बनावट हिशेब या कंपनीने बँकांना सादर केला होता. याप्रकरणी सर्वप्रथम सीबीआयने भोपाळमध्ये गुन्हा दाखल केला. त्याअनुषंगाने तपास केला. आरोपपत्र देखील दाखल केलंय.

कंपनीच्या व्यवहारातील आर्थिक गुंतागुंत उजेडात आली. त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. मेसर्स नारायण एक्सपोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि तिच्या समूह कंपन्यांची कार्यालये, संचालक मंडळांच्या निवासस्थानांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. या प्रकरणाचा आणखी तपास ईडीकडून केला जातोय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply