Earthquake News : जम्मू-काश्मीर अन् लडाखमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; भल्यापहाटे लोकांची पळापळ

Earthquake News : जम्मू-काश्मीर आणि लेह लडाखमध्ये मंगळवारी (२६ डिसेंबर) पुन्हा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भल्यापहाटे जमीन हादरल्याने अनेक ठिकाणी घरातील भाड्यांची पडझड झाली. त्यामुळे लोक घाबरून रस्त्यावर उतरले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, लडाखमध्ये झालेल्या या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी होती. 

भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलमध्ये १० किलोमीटर भूगर्भात होता. लडाखशिवाय जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड भागात रात्री १ वाजून १० मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.७ रिश्टर स्केल इतकी होती. 

Zombie Deer Disease : अमेरिकेत झॉम्बी आजाराने वाढवलं टेन्शन, हरणांमध्ये दिसतायत विचित्र लक्षणं; आणखी एका महामारीची भीती?

याआधी २५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता नागालँडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. लडाखपासून काश्मीरपर्यंत आज पहाटे झालेल्या भूकंपात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. गेल्या महिन्याभरापासून जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply