Earthquake In Maharashtra : पाटणसह सांगली काेल्हापूरला भूकंपाचा धक्का, काेयना धरण सुरक्षित

Earthquake News  : कोल्हापूरमध्ये आज 3.4 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे. हे भूकंपाचे धक्के सकाळी 6.45 च्या सुमारास जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्रस्थळ 5 किमी खोल असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली असल्याची माहिती समोर आलेली नाही.

कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता.

कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज (16 ऑगस्ट) सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Bhatghar Dam At Bhor : दुर्दैवी! पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; भाटघर धरणाच्या पाण्यात बुडून मुलीसह वडिलांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह जवळच्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पहाटे 6.40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्णाण झाले होते.

कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर हे भूकंप धक्के जाणवले असून धरण सुरक्षित आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर कोल्हापूर  सांगली, सातारासह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरापासून 15 किमी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply