Earthquake : मोठी बातमी! दिल्ली, बिहार अन् बंगालमध्ये भूकंपाचे धक्के; 7.1 रिश्टर स्केल तीव्रता

Earthquake in Nepal : आज (मंगळवारी) सकाळी लोक झोपेत असतानाच भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. दिल्ली, बिहारसह पश्चिम बंगालमध्ये हादरले जाणवले. सकाळी ६.३५ वाजता नेपाळमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या लोबुचेपासून 93 किमी उत्तर-पूर्वेला होता. नेपाळमध्ये झालेल्या भूंकपाचे हादरे भारत, बांग्लादेश आणि चीनमध्ये जाणवले आहेत. अद्याप कुठेही कोणतीही हानी किंवा जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

 

पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे सकाळी 6:37 वाजता (7 जानेवारी) भूकंपाचे (Earthquake in West Bengal) धक्के जाणवले. जवळपास ३० सेकंदापर्यंत जमीन हादरत होती. नागरिक झोपेत असताना अचानकच भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे भीतीचे वातावरण होते. जलपाईगुडीमध्ये सकाळी 6.35 वाजता आणि त्यानंतर काही वेळातच बिहारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. बिहारची राजधानी पाटणा व्यतिरिक्त इतर काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवलेत.दिल्ली-एनसीआरमध्येही भूकंपामुळे हादरे बसले आहेत.

HMPV Virus Cases : विमानतळावर तपासणी कधी सुरु करणार? पुण्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलं उत्तर

बिहारमध्ये 5.1 इतकी तीव्रता

बिहारमध्ये 6 वाजून 40 वाजता भूकंपाचे हादरे जाणवल्याची नोंद झाली आहे. येथील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.1 इतकी मोजण्यात आली. समस्तीपूर, मोतिहारीसह अनेक भागात सकाळी 6.40 वाजता भूकंपाचे हादरे जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, पाच ते १० सेकंद बिहारमध्ये भूकंपाचे हादरे जाणवत होते. भूकंप इतका जोरदार होता की लोक घाबरून घराबाहेर पळाले. कोणताही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

 

कोणतीही जिवितहानी नाही

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, नेपाळ-तिबेट सीमेजवळ लोबुचेच्या 93 किलोमीटर ईशान्येला सकाळी 6:35 वाजता भूकंप झाला. त्याची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी होती. आतापर्यंत यामुळे कोणत्याही नुकसानीचे अथवा जिवितहानीचे वृत्त नाही.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply