Dr. Mangala Narlikar : ज्येष्ठ गणिततज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर कालवश; ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पत्नी गणिततज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन झालं आहे. डॉ. मंगला नारळीकर यांनी पुण्यात वयाच्या ८१ व्या अखेरचा श्वास घेतला. गणिततज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधनं झालं आहे.

डॉ. मंगला नारळीकर यांना गेल्या दोन महिन्यापासून कॅन्सरचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे या आजारामुळे नारळीकर या आजारी होत्या. डॉ. मंगला नारळीकर या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या. नारळीकर यांना गीता, गिरिजा व लीलावती तीन कन्या आहेत.

डॉ. मंगला नारळीकर यांच्या मृत्यूने नारळीकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डॉ. मंगला नारळीकर यांच्याकडे 'संश्लेषात्मक अंक सिद्धांत' या विषयात त्यांची पीएच.डी. होती. तसेच 'गणितगप्पा’, 'गणिताच्या सोप्या वाटा' यांसारखी पुस्तक त्यांनी लिहिली.

Gondia Heavy Rain : २४ तासांत गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पांगोली नदीने गाठली धोक्याची पातळी

१९८६ साली वयाच्या ४३ व्या वर्षी कॅन्सरशी सामना करायची वेळ त्यांच्यावर आली होती. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावरही डॉ. मंगला नारळीकर यांनी मात केली होती. गेले काही महिने त्यांना कॅन्सरचा पुन्हा एकदा त्रास सुरू झाला होता.

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी आणि सहकारी म्हणून मंगला नारळीकरांनी खंबीरपणे साथ दिली. डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर यांच्या निधनाने नारळीकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply