Dr.Ajit Ranade : गोखले इन्स्टिट्यूटचे अजित रानडे यांचा अखेर राजीनामा; तात्काळ कुलगुरू पद सोडण्याचा निर्णय

Pune : गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू अजित रानडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे अजित रानडे यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. अजित रानडे यांनी संस्थेला राजीनामा लिहित तात्काळ पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी समितीकडून संस्थेत गैरव्यवहार केल्याचा आरोप अजित रानडे यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा सध्या सुरू आहे.

Pimpri Chinchwad : पिंपरीत हिट अँड रन, ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू, ७२ तासानंतरही आरोपी फरार

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गोखले इन्स्टिट्यूटचे तत्कालीन कुलपती दिवंगत बिबेक देबराय यांनी गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू अजित रानडे यांना कुलगुरू पदावरून तडका फडकी हटवलं होतं. त्या विरोधात अजित रानडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, त्यावेळी उच्च न्यायालयाने रानडे यांच्या हकालपट्टीला स्थगिती दिली होती. तसेच, रानडे यांच्या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने रानडे यांची गोखले इन्स्टिट्युटच्या कुलगुरू पदावरून करण्यात आलेल्या हकालपट्टीवर ताशेरे ओढले होते.

उच्च न्यायालयाने रानडे यांना कुलगुरू पदावरून हटवण्याबाबत अनियमितता झाल्याचे म्हटलं होतं. न्यायालयाच्या या टिप्पणीनंतर संस्थेचे कुलपती बिबेक देवराय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता अजित रानडे यांनीही स्वतःहून गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदाचा राजीनामा दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply