Dombivli News : डोंबिवलीतील बटर कारखान्यावर क्राइम ब्रांचचा छापा; झाडझडती घेताच अधिकारीही चक्रावले

Dombivli News : डोंबिवली जवळील खोणी गावात एका निर्माणाधीन इमारतीमध्ये सुरू असलेल्या बटर बनवण्याचा कारखान्यावर अचानक कल्याण क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी समोर जे दृश्य दिसून आलं, ते पाहून अधिकारीही चक्रावून गेले. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली.

डोंबिवलीजवळील काटई बदलापूररोडवरील खोनी गावाजवळ एका निर्माणाधीन निर्माणाधिन इमारतीमध्ये बनावट बटर बनवले जात असल्याची माहिती कल्याण क्राइम ब्रांचचे कर्मचारी दत्ताराम भोसले आणि गुरुनाथ जरग यांना मिळाली होती. 

Raj Thackeray : राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना हस्तलिखीत चिठ्ठी; सर्वच पक्षांनी आदर्श घ्यावा असा संदेश

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल म्हस्के, पोलीस अधिकारी संदीप चव्हाण, पोलीस कर्मचारी दत्ताराम भोसले, गुरुनाथ जरग, अनुप कामत यांच्या पथकाने इमारतीवर अचानक छापा टाकला.

या ठिकाणी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने बटर तयार केले जात असल्याचं अधिकाऱ्याचं निर्देशनात आलं. यावर तातडीने कारवाई करत क्राईम ब्रांचने पिंटू यादव आमि प्रेमचंद फेकूराम या दोन आरोपींना अटक केली. त्याचबरोबर तीन लाखांचा मुद्देमाल देखील जप्त केला.

धक्कादायक बाब म्हणजे, अत्यंत घाणेरड्या पद्धतीने तयार केलेले बनावट बटर एका नामांकित कंपनीच्या बॉक्समध्ये पॅक केले जात होते. तसेच ते शहरातील सँडविच हातगाडी, धाबे, हॉटेल व्यावसायिकांना विकले जात होते. या ठिकाणाहून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध बटर बनवण्याकरता लागणारे साहित्य, मशीन कच्चामाल व नामांकित कंपनीच्या कागदी बॉक्स जप्त केले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply