Dombivli MIDC Fire : डोंबिवली MIDC मधील कंपनीत मोठा स्फोट; जमीन थरथरली, घरांच्या काचा फुटल्या, आगीचे लोळ अन् धुराचे लोट

Dombivli MIDC Fire : डोंबिवलीत एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळं भीषण आगही लागली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या परिसरातील जमीन थरथरली. तर काही घरांच्या काचाही फुटल्या. आगीचे लोळ आणि धुराचे लोटांनी आकाश अक्षरशः काळवंडलं होतं. या दुर्घटनेत पाच ते सहा नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

डोंबिवलीतील  एमआडीसी कंपनीत भीषण स्फोट झाला. कंपनीत भीषण स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची घटना घडली. कंपनीला आग लागल्यानंतर परिसरात आणि आकाशात धुराचे लोट पसरले. त्यामुळे परिसर अक्षरशः काळवंडला होता.

Pune Porsche Car Accident : पोर्शेमध्ये तांत्रिक बिघाड ते मुलाकडे गाडी देण्याची सूचना; विशाल अग्रवाल यांच्या ड्रायव्हरने जबाबात दिली माहिती

या भीषण स्फोटानंतर परिसरात राहणारे नागरिक घाबरले. भीषण स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या आहेत. या कंपनीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं प्रयत्न सुरु आहेत.

या स्फोटाच्या घटनेत ५ ते ६ कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

कंपनीत भीषण स्फोट झाल्यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांची एकच धावाधाव झाली. या कंपनीतील 30 हून कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. स्फोट झाल्यानंतर परिसरात घरांच्या काचा फुटल्या. भीषण स्फोटानंतर लागलेली आग आता दुसऱ्या कंपनीत देखील पसरत असल्याची माहिती मिळत आहे.

या आगीतील जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या स्फोटाच्या घटनेनंतर पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसरातील नागरिकांना घटनास्थळापासून दूर जाण्यास सांगितलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply