Dombivli : “… हे सुधारणार नाहीत” डोंबिवलीच्या शॉरमा गर्लला पुन्हा दिला त्रास , Video व्हायरल

image

डोंबिवली स्टेशन बाहेर अनेकजण उदर्निवाहासाठी छोटा मोठा व्यवसाय करतात. यावर अनेकदा पालिकेने कारवाई केली असून देखील इथे अनेक परप्रांतीय किंवा स्थानिक मराठी नागरिक दुकान टाकून रस्त्यालगत व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी याच डोंबिवली स्टेशन बाहेर शोरमा विकणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. तिचे असे म्हणणे होते की तिच्याकडून हप्ता वसूल केला जातो, शिवाय तिच्या स्टॉलवरून तिच्याशी हुज्जत घातली जाते. या व्हायरल व्हिडिओनंतर राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांनी तरुणीला पाठिंबा देत तिला नवीन स्टॉल लावून दिला. त्यानंतर आता पुन्हा एकदा या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्याशी आजूबाजूला असलेल्या व्यावसायिकांनी हुज्जत घातली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *