Dombivli : बोर्डाच्या पेपरपूर्वीच काळाचा घाला, डोंबिवलीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, रेल्वेट्रॅकजवळ मृतदेह; आई-बापाचा मन हेलावणारा आकांत

Dombivli : आसनगाव स्थानकाजवळ रेल्वेच्या रुळाशेजारी एका मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही अल्पवयीन मुलगी डोंबिवलीच्या भोपर परिसरात राहत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. ट्रेनमधून पडून या मुलीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव आकांक्षा जगताप असे आहे. १६ वर्षीय आकांक्षा डोंबिवलीतल्या एका शाळेत दहावी इयत्तेत शिकत होती. २२ फेब्रुवारीला तिचा पहिला पेपर होता. दहावीची परिक्षा सुरु होण्याआधीच तिचा मृतदेह पोलिसांना आसनगाव-वाशिंद या स्थानकांच्या दरम्यान रेल्वेच्या रुळाशेजारी आढळला.

डोबिंवलीच्या भोपर परिसरात ही मुलगी कुटुंबासह राहत होती. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी आकांक्षा आईवडिलांसह मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी गेली होती. संध्याकाळी ते सर्वजण डोंबिवलीलाl परतले. त्याचदरम्यान आकांक्षा अचानक गायब झाली. तिच्या आईवडिलांनी शोधाशोध करुनही ती सापडली नाही.

Chalisgaon Crime : नवरदेवाची आई जेवायला बसताच साधली संधी; साडेदहा लाख रुपयांचे दागिने असलेली पर्स घेऊन चोरटा फरार

त्याच दिवशी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आसनगाव आणि वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेरुळाशेजारी एका मुलीचा मृतदेह आढळला. कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करुन तपासाला सुरुवात केली. पुढे तपासादरम्यान कल्याण रेल्वे पोलिसांना आकांक्षाची ओळख पटली.

आकांक्षा डोंबिवली रेल्वे स्थानकात उरतली. मात्र त्यानंतर तिने रेल्वे स्थानकावरुन आसनगावला जाण्यासाठीची ट्रेन पकडली आणि ती आसनगावच्या दिशेने निघाली. तेव्हा ट्रेनमधून पडून तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. पण ती आसनगावच्या ट्रेनमध्ये का बसली, तिचा अपघात झाला की घातपात याबाबत पोलीस तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply