Divya Shinde: बिग बॉसच्या घरात मी मरणाच्या दारात होते पण…, दिव्या शिंदेचा मोठा खुलासा

Divya Shinde On Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दिव्या शिंदे हिला घरातून अचानक बाहेर काढल्यानंतर चर्चांना उधाण आलं. घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर दिव्या हिला बिग बॉसने घरातून बाहेर काढलं. दिव्या हिला अचानक घरातून बाहेर काढल्यानंतर तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. दिव्या घरातून बाहेर आल्यानंतर तिच्या टीमने सोशल मीडियावर एक पोस्ट करत लवकच सर्वकाही सांगू असं सांगितलं होतं. आता दिव्या हिने पत्रकार परिषद घेत बिग बॉसच्या घरातील मोठं सत्य समोर आली आहे.

पत्रकार परिषदेत दिव्या हिने अनेक गोष्टी सांगितल्या… बिग बॉससाठी कसं सिलेक्शन होतं? असा प्रश्न देखील दिव्या हिला विचारण्यात आला. यावर दिव्या म्हणाली, ‘बिग बॉसची टीम माझ्याकडे आली होती. आमच्या तीन मिटिंग झाल्या… मी त्यांच्या समोर काही अटी ठेवल्या होत्या. त्यांनी माझ्या अटी मान्य देखील केल्या… मी माझ्या आजारपणाबद्दल त्यांना सांगितलं होतं… मला आराम करायला वेळ मिळायला पाहिजे असं मी त्यांना सांगितलं होतं.’ त्यावर त्यांनी मला आम्ही पूर्ण काळजी घेऊ असं सांगितलं…

पुढे दिव्या म्हणाली, ‘त्यांनी माझी काळजी घेतली नाही. मरणाच्या दारात असताना त्यांनी मला दोन दिवसांनंतर इंजेक्शन दिलं… माझा ऑक्सिजन देखील कमी होत होता… तेव्हा दोन दिवसांनंतर मला इंजेक्शन देण्यात आलं…’

बिग बॉसने दाखवलेल्या फुटेजबद्दल देखील दिव्या हिने मोठा खुलासा केला. बिग बॉसने काही फुटेज दाखवलेच नाहीत… असा खुलासा दिव्या हिने केला आहे. सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीच्या चर्चा सुरु आहे. दिव्या हिची हाकलपट्टी केल्यानंतर आणि ओमकार राऊत घराबाहेर आल्यानंतर बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

सध्या बिग बॉगमध्ये दिपाली सय्यद, सागर कारंडे, राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे, सचिन कुमावत, तन्वी कोलते, आयुष संजीव, करण सोनावणे, प्रभु शेळके, रुचिता जामदार, अनुश्री माने, रोशन भजनकर, विशाल कोटियन स्पर्धक दिसत आहेत. सांगायचं झालं तर, राखी शोमध्ये आल्यापासून एक वेगळीच रंगत आली आहे. आता शोमध्ये  पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *