Disha Salian case: दिशा सालियान प्रकरणाची SIT चौकशी; फडणवीसांची घोषणा

Disha Salian case: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची तत्कालीन मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात गाजत आहे. आदित्य ठाकरेंवर आरोप करतानाच, भाजप आमदार नितेश राणे यांच्यासह इतर सदस्यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. ही मागणी मान्य करत, दिशा सालियान प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दिशा सालियान प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलीस करत होते. सीबीआयने याची चौकशी केली नाही. दिशाच्या कॉलमध्ये AU कोण आहे, हे समोर आले पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी विधानसभेत केली होती. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, असेही राणे म्हणाले. 

दिशा सालियान प्रकरणी एसआयटी चौकशी होणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. दिशा सालियान प्रकरणी सीबीआय चौकशी झालेली नाही. राजकीय अभिनिवेश न ठेवता काही पुरावे मांडले जातात. कुणालाही टार्गेट करायचे नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. 

दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधारी भाजपचे आमदार नितेश राणे आणि इतर सदस्य आक्रमक झाले. AU कोण हे समोर आले पाहिजे, अशी मागणी लावून धरली. त्यानंतर या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. त्यानंतर विरोधक आणखी आक्रमक झाले. विरोधी पक्षाचे सदस्य वेलमध्ये आले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. दादागिरी नहीं चलेगी...अशा घोषणा दिल्या. न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या... अशा घोषणाही विरोधी पक्षाने दिल्या.

काँग्रेस काय म्हणाला?

दिशा सालियानचा मृत्यू अपघाताने झाला हे सीबीआयने स्पष्ट केले आहे. दिशाच्या आईवडिलांनी दिशाच्या मृत्यूचे राजकारण करू नका असे जाहीर सांगितले, तरीही पुन्हा SIT चौकशी... भाजपचे गलिच्छ राजकारण दर्शवतेच, पण यातून सीबीआय, मोदीजी व अमित शहा यांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दिसतो याचेही भान नाही, असे काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply