Dinesh Phadnis Passed Away : CID चे इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडणीस यांचे निधन; टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का

Dinesh Phadnis Passed Away: 'सीआयडी' या लोकप्रिय शोमध्ये फ्रेडी (फ्रेडरिक) ची भूमिका साकारणारे दिनेश फडणीस हे गेल्या काही दिवासांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरु होते.

मात्र त्यांची आजाराशी झुंज अपयशी ठरली. काल रात्री म्हणजेच ४ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंबधितचे वृत्त दिले आहे. 1 डिसेंबरच्या रात्री त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तुंगा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

दिनेश यांचे सहकलाकार आणि 'सीआयडी' अभिनेता दयानंद शेट्टी यांनी सांगितले होते की यकृत निकामी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आज ५ डिसेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सीआयडी या प्रदीर्घ काळ चालणार्‍या शोची संपूर्ण स्टारकास्ट त्यांच्या निवासस्थानी पोहचली आहे.दिनेश फडणीस यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. चाहते आणि कलाकार पोस्ट शेयर करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

दिनेश फडणीस यांनी 'सीआयडी'मध्ये अनेक वर्षे काम केले. 1998 ते 2018 पर्यंत त्यांनी फ्रेडरिकची भूमिका साकारली. याशिवाय 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्येही ते छोट्या भूमिकेत दिसले होते. शोमधील त्यांची फनी स्टाइल सर्वांनाच आवडली.

इतकंच नाही तर सीआयडी व्यतिरिक्त दिनेश यांनी अदालत, सीआयडी स्पेशल ब्युरो, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकांमध्येही अभिनय केलाय. याशिवाय ते आमिर खानच्या चित्रपट 'सरफरोश' आणि हृतिक रोशनच्या 'सुपर ३०'मध्येही दिसला होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply