Dhule News : दुकानाबाहेर मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक; दुकानाबाहेर केले आंदोलन

Dhule News :  दुकाना बाहेर मराठी पाट्या लावण्यासंदर्भात मनसेतर्फे गेल्या कित्येक वर्षांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशनानंतर मुंबईमध्ये मनसेकडून मराठी भाषांचे बोर्ड लावण्यासाठी आवाहन केले जात आहे. त्यानुसार धुळ्यात आज मनसेच्यावतीने दुकानांबाहेर आंदोलन करण्यात आले. 

दुकाना बाहेर इतर भाषांमधील असलेले फलक हटवून मराठी भाषेत फलक लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली होती. या संदर्भात न्यायालयाने देखील मराठी फलक लावण्या संदर्भात आदेश देऊन देखील अनेक दुकानदारांनी फलक बदलविले नाही. ज्या दुकान मालकांनी अद्यापही आपल्या दुकानाच्या बाहेर इतर भाषांचे बोर्ड लावलेले आहेत; अशा दुकान मालकांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पुन्हा एकदा बोर्ड मराठीतून लावण्या संदर्भात विनंती केली आहे. 

Maharashtra Cabinet Meeting : शिंदे सरकारचे 'मुस्लिम कार्ड'... 'हा' निधी 30 कोटींवरून 500 कोटींवर

धुळे शहरात विविध दुकानाबाहेर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उभे राहून दुकान मालकांना मराठीतून बोर्ड लावण्या संदर्भात विनंती केली आहे. मनसेच्या या विनंतीला बहुतांश दुकान मालकांनी सकारात्मक भूमिका दर्शवत दुकानाच्या पाट्या देखील बदलण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली असून, आगामी काही दिवसात या पाट्या बदलल्या गेल्या नाही; तर मनसे स्टाईल खेळखट्याक आंदोलन करून या दुकान मालकांना उत्तर दिले जाईल असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply