Dhule News : मंत्री उदय सामंत यांच्या पुतळ्याचे दहन; केमिकल फॅक्टरीला परवानगी दिल्याचा निषेध

धुळे :  उद्योग मंत्री उदय सावंत यांनी नरडाणा एमआयडीसी येथे ११५ एकर जागा ही केमिकल फॅक्टरीला दिली आहे. याचा निषेध शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे शेतकऱ्यांनी केला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

मंत्री उदय सामंत यांनी नरडाणा एमआयडीसी परिसरात केमिकल फॅक्टरीला परवानगी दिली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती नापीक होणार असल्याचे म्हणत, या केमिकल युक्त फॅक्टरीतून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये देखील केमिकल युक्त पाणी मिसळले जाण्याची भीती शेतकर्यांतर्फे व्यक्त करण्यात आली. यामुळे मंत्री उदय सामंत यांचा निषेध करण्यासाठी नरडाणा येथील शेतकऱ्यांनी मंत्री उदय सामंत यांच्या पुतळ्याचे दहन करत रास्ता रोको केला आहे. 

Beed Farmer End Life: पावसाअभावी शेतातील पीक करपू लागले, चिंताग्रस्त शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

मंत्री सामंत यांच्या विरोधात घोषणाबाजी 
उद्योग मंत्री उदय सावंत यांनी नरडाणा एमआयडीसी येथे 115 एकर जागा ही केमिकल फॅक्टरीला दिली असून, त्याचा निषेध करण्यासाठी नरडाणा येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा पुतळा दहन करण्यात आले, तसेच मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता रोखो देखील करीत मंत्री उदय सामंत यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply