Dhule : पोलिसांना चकवा देत कार चालकाने जंगलात ठाेकली धूम; आठ लाखांची दारु जप्त

Dhule Crime : पिंपळनेर-नवापूर रस्त्यावर पिंपळनेर पोलिसांना रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना संशयास्पद रित्या आढळून आलेल्या कारमध्ये अवैधपणे दारूची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी दारू साठ्यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान संशयित कारसह अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला. 

साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पिंपळनेर-नवापूर रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस पथक गस्त घालत असताना, पोलिसांना पांढऱ्या रंगाची कार संशयास्पद रित्या आढळून आली.

Manipur Violence : मणिपूरमधील परिस्थिती चिघळली; हिंसक जमावाने केंद्रीय मंत्र्याचं घर पेटवलं,

पोलिसांनी या कारचालकाला कार थांबविण्याचा इशारा देखील केला, परंतु कारचालकाने भरधाव वेगाने कार पळवत नेली व त्यावर संशय बळवल्याने पोलिसांनी तात्काळ या कारचा पाठलाग केला. परंतु काही अंतरावर गेल्यानंतर कार चालकाने रस्त्याच्या कडेला जंगलाच्या दिशेने कार उभी करून जंगलात पळ काढला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी पाठलाग करून देखील अंधाराचा फायदा घेत हा कारचालक पळून जाण्यात यशस्वी झाला.पोलिसांनी या कारची तपासणी केली असता या कारमध्ये देशी विदेशी दारूचा साठा पोलिसांना आढळून आला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल आठ लाखांहून अधिकचा दारू साठ्यासह मुद्देमाल हस्तगत केला आहे, चोरट्या मार्गाने अवैधपणे गुजरातकडे या दारूची वाहतूक केली जात असल्याचा संशय पोलिसांना असून पुढील तपास पिंपळनेर पोलीस करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply