Dhule : ठाकरे शिवसैनिकांचा जनआक्रोश शिंगाडे मोर्चा; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तहसीलवर धडक


धुळे : शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज शिंदखेडा तहसील कार्यालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांतर्फे शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवसैनिकांनी यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. 

शेतकऱ्यांना अखंडित १८ तास वीजपुरवठा वीज वितरण विभागातर्फे देण्यात यावा. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खराब झालेल्या ट्रान्सफॉर्मरची तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन दुरुस्ती करून देण्यात यावी. तसेच शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो हमीभाव मिळावा; या मागण्यांसह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा शिंदखेडा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. 

Ratnagiri Accident : मोठी दुर्घटना! दापोलीत ट्रक- वडाप गाडीचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू

तीव्र घोषणाबाजी

या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक सहभागी झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधामध्ये तसेच प्रशासनाच्या मनमानी कारभारा विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *