Dhule News : शंभरहून अधिक प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा; धुळ्याच्या प्रशिक्षण केंद्रातील प्रकार

Dhule News : पोलिस प्रशिक्षण केंद्रातील शंभराहुन अधिक प्रशिक्षणार्थीं पोलिसांना जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित जवानांना तातडीने हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

धुळे येथील प्रशिक्षण केंद्रात सहाशे प्रशिक्षणार्थी आहेत. या सर्वांनी १४ मार्चला सायंकाळी सातनंतर जेवण केले. यानंतर येथील शंभराहून अधिक प्रशिक्षणार्थींना मळमळ, उलटी, जुलाब असा त्रास जाणवू लागला.  त्यामुळे प्राचार्य विजय पवार यांनी यंत्रणेच्या मदतीने शंभरावर प्रशिक्षणार्थींना तातडीने जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी नेले. यानंतर सर्व प्रशिणार्थींवर रात्री उपचार करण्यात आले. 

Mumbai Crime News : कॉलनीतील सहकाऱ्याच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; तटरक्षक दलातील दोन जवानांना अटक

वर्षभरापूर्वी देखील असाच प्रकार घडला होता. चौकशीत मांसाहारी जेवण, यानंतर खिर खाल्ल्यामुळे आणि त्या कालावधीत उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे असा प्रकार घडल्याचा निष्कर्ष निघाला होता.  पोलिस प्रशिक्षण केंद्रातील गुरुवारी घडलेला प्रकार कशामुळे झाला याची अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.  



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *