Dhule News : तर ५ मार्चपासून बेमुदत काम बंद; वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचा इशारा

Dhule News : महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने काही प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार  धुळ्यात देखील संघटनेच्या दोन दिवस काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या काम बंद आंदोलनामुळे महावितरणच्या सबस्टेशन अंतर्गत कामावर परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ  कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार धुळ्यात देखील संघटनेच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दोन दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने ६० वर्षांपर्यंत शाश्वत रोजगार देण्यात यावा. त्याचबरोबर समान काम समान वेतन, तसेच ३० टक्के पूरक भत्ता या प्रमुख मागण्यांसह इतर आणखी मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. 

Nanded Political News : अशाेक चव्हाणांसाठी धक्कातंत्र, भाजप खासदारांच्या बहिणीचे काँग्रेसच्या दिशेने पाऊल ?

संघटनेच्या वतीने आंदोलनाचा पाचवा टप्पा असून या आंदोलनाची दखल राज्य सरकारतर्फे घेण्यात आली नाही; तर ५ मार्च मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील आंदोलकांतर्फे देण्यात आला आहे. या आंदोलनावेळी सर्व आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील केल्याचे बघावयास मिळाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply