Dhule News : धुळ्यात लिंबूच्‍या आकाराची गार; अवकाळी, गारपिटीने लग्न समारंभात धावपळ

धुळे : हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्‍यानुसार गेल्‍या तीन दिवसांपासून  जिल्‍ह्यात अवकाळी पाऊस व गारपिट होत आहे. यात आज दुपारच्‍यावेळी साक्री तालुका परिसरात लिंबूच्‍या आकाराएवढी गार पडली आहे. यामुळे प्रचंड नुकसान झाल्‍याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार आज साक्री तालुक्यात बहुतांश ठिकाणी अवकाळीसह गारपिटीने हजेरी लावली. या गारपिटीमुळे शेती पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. साक्री तालुक्यातील बहुतांश ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. छडवेल या ठिकाणी लिंबूच्या आकाराची गार पडताना बघावयास मिळाली.

लग्‍न समारंभात धावपळ

काही ठिकाणी आज लग्नाची तारीख असल्यामुळे लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पाहुणे मंडळींची एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे. लग्न मंडपात देखील अवकाळी पावसामुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दोन्हीकडील पाहुणे मंडळांची एकच धावपळ उडाली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply