Dhule LCB Action : धुळ्यात उधळला नशेचा बाजार; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Dhule LCB Action :  धुळ्यात गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांचा वापर करून नशेचा बाजार केला जात आहे. हा बाजार धुळ्याच्या  स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकाने उधळून लावलेलं असून नशेचा बाजार करणाऱ्या दोघा आरोपींच्या पथकाने गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांसह ताब्यात घेतले आहे. 

सुरत  येथून धुळ्यामध्ये गुंगीकारक औषधांच्या बाटल्या आणल्या जात असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचला असता रेल्वे स्टेशन रोड परिसरामध्ये संबंधित इसम हा रिक्षातून या बाटल्यांचे बॉक्स उतरवत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ संबंधित इसमास ताब्यात घेत या सर्व बॉक्सेसची तपासणी केली असता, त्यामध्ये गुंगीकारक औषधांचा मोठ्या प्रमाणात साठा पोलिसांना आढळून आला आहे. 

Accident News : पैठण शेवगाव मार्गावर दुचाकींची जोरदार धडक; गाडीने जागेवरच घेतला पेट, १ ठार

१ लाख १३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

पोलिसांनी या कारवाईदरम्यान सुरतहून आलेल्या इसमासह धुळ्यातील एका इसमास देखील ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुंगीकारक औषधांच्या जवळपास ३५७ बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत जवळपास एक लाख १३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हस्तगत केला असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply