Dhule Crime News : गुटख्याच्या ट्रकसह दाेघे ताब्यात, 10 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त; धुळे पोलिसांची धडक कारवाई

Dhule Crime News : धुळे तालुका पोलिसांनी अवैधरित्या गुटखा तस्करी राेख लाखाे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी दाेघांना ताब्यात घेतले आहे. या दाेघांच्या चाैकशीनंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तवली आहे.

गुप्त माहितीदारातर्फे मिळालेल्या माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांनी सापळा रचून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची अवैधरित्या होत असलेली तस्करी रोखली. यामध्ये लाखो रुपयांच्या मुद्देमाला सकट दोघा जणांच्या मुसक्या देखील पोलिसांनी आवळल्या आहेत.

 

सुरत वरून धुळे तालुक्यातील कुसुंबा मार्गे मालेगावकडे येत असलेला प्रतिबंधित गुटखा संदर्भात पाेलिसांनी गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर तालुका पोलिस अधिकाऱ्यांनी सापळा रचला. 

त्यात पोलिसांनी ट्रकसह 10 लाख 62 हजार 874 रुपये किमतीचा गुटखा व मुद्देमाल पकडला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी करीत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *