Dhule Crime News : मद्य वाहतुक प्रकरणी धुळे एलसीबीकडून तिघांना अटक, 36 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त

Dhule Crime News : नगाव शिवारात वाहनातून होणारी अवैध दारुची वाहतूक रोखत धुळे एलसीबीने मद्य तस्करांना दणका दिला आहे. विशेष म्हणजे तस्करांनी चक्क सिनेमा स्टाईलने ही दारूची अवैध वाहतूक केली असल्याचे आढळून आले. या कारवाईत एलसीबीने दारुसाठ्यासह दाेन वाहन असा एकूण 36 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना ताब्यात घेतले आहे.

एका मालवाहू वाहनातून शिरपूरच्या दिशेने अवैध दारुची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पीआय दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी संबंधित वाहनाचा शोध घेवून त्यावर कारवाई करण्यासाठी पथकाला रवाना केले.

NCP Crisis : 'घड्याळा'मुळे गोंधळ; अजित पवार गटाला नवे चिन्ह द्या.. शरद पवार गटाची मोठी मागणी; सुप्रीम कोर्टात काय घडलं?

या पथकाने धुळे शहराबाहेर नगाव शिवारात धुळ्याकडून सोनगीरच्या दिशेने एक कार व तिच्या मागे एक मालवाहू वाहन जाताना दिसले. या दोन्ही वाहनांचा संशय आल्याने पथकाने वाहनांना अडविले. ही दोन्ही वाहने तपासणी करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आली.

वाहनांच्या तपासणीत वाहनाच्या मध्यभागी सिमेंटचे पत्रे कापून त्यात दारुचे बॉक्स ठेवलेले होते. या दारुची वाहतूक विनाव्यत्यय व्हावी यासाठी मालवाहू वाहनाच्या पुढे एक कारही ठेवण्यात आली होती.

या कारवाईत एलसीबीने दारुसाठ्यासह दाेन्ही वाहनं मिळून एकूण 36 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त करत पाेलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पाेलिस सतर्क झाले आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply