Dhule News : मुंबई- आग्रा महामार्गावरील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

मुंबई - धुळे जिल्ह्यातील पळासनेर येथे मुंबई- आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

समृद्धी महामार्गावरील अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर (ता. शिरपूर) फाट्याजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. खडीने भरलेल्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे धावणाऱ्या कारला जोरदार धडक देत रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये शिरला.

Khadakwasla Project : खडकवासला प्रकल्पांत ४.१६ टीएमसी पाणीसाठा; पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस

या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

समृद्धी महामार्गावरील अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर (ता. शिरपूर) फाट्याजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. खडीने भरलेल्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे धावणाऱ्या कारला जोरदार धडक देत रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये शिरला.

यावेळी तेथे चहा-नाश्त्यासाठी थांबलेल्या प्रवाशांना तसेच बसथांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थी व प्रवाशांना अक्षरशः चिरडून टाकले. घटनेनंतर मृतदेहांचा खच पाहून व जखमींच्या आरोळ्या-किंचाळ्या ऐकू येत होत्या. या घटनेने संपूर्ण धुळे जिल्हा सुन्न झाला आहे.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply