Dhule Accident : धुळ्यात भरधाव ट्रकने क्रुझरला उडवलं; २० ते २५ जण तापी नदीत बुडाले

Dhule Shirpur Accident : धुळे जिल्ह्यातून अपघाताची एक भयंकर घटना समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकचे अचानक समोरील टायर फुटले. त्यानंतर ट्रक अनियंत्रित झाला. त्याने थेट समोरून येणाऱ्या क्रुझरला धडक दिली. धडक इतकी भीषण होती. क्रुझर थेट पूलावरून तापी नदीत कोसळली. सोमवारी (२३ जानेवारी) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

या भीषण अपघातात २० ते २५ जण तापी नदीत बुडाले असल्याची माहिती आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शिवारात हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे.

अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रात्रीची वेळ आणि अंधार असल्याने बचावकार्यात मोठी अडचण येत आहे. त्यातच तापी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने क्रुझरमधील प्रवाशांना शोधण्याचं काम सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार अपघातग्रस्त ,क्रुझर शिरपूरच्या दिशेने जात होती. त्याचवेळी समोरून भरधाव ट्रक येत होता. दरम्यान, दोन्ही वाहने तापी नदीच्या पूलावर आली असता, अचानक ट्रकचे समोरील टायर फुटले आणि ट्रकने थेट समोरून येणाऱ्या क्रुझरला धडक दिली.

धडक इतकी भीषण होती, की क्रूझर थेट पूलावरून तापी नदीत कोसळली. या भीषण अपघातात २० ते २५ जण तापी नदीत बुडाले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमी झालेल्या प्रवाशांना नदीबाहेर काढलं. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी १० ते १५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply