Dharavi Fire News : धारावीत भीषण अग्नितांडव; जिमला लागलेल्या आगीत ६ जण जखमी

Dharavi Fire News : धारावीतील एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सहाजण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या होत्या. आज पहाटे ही आग लागल्याची माहिती मिळत आहेत. धारावीत आग लागलेल्या ठिकाणी वाऱ्याच्या वेगात बचावकार्य सुरू आहे.

धारावीतील अशोक मिल कंपाउंड रोडवरील कला किला येथे ही आगीची घटना घडली आहे. ही जमिनीपासून गोदामाच्या वरच्या  तीन मजल्यांपर्यंत पोहोचली होती. या घटनेत इमारतीमधील लाकडी साहित्य आणि फर्निचर जळाल्याची माहिती मिळत आहे. धारावीत अशोक मिल कंपाऊंडमध्ये कमर्शियल गरमेट, जिमला पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास आग लागली होती.

Pimpri Chinchwad Crime : प्रियकराचे धक्कादायक कृत्य; प्रेयसीच्या मित्राला गाडीने चिरडण्याचा प्रयत्न

घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच सहा अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. या आगीत एकूण ६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग पूर्णपणे नियंत्रणात आली असून कुलिंगचं काम सुरू असल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष सावंत यांनी दिली आहे.

मुंबईमध्ये धारावीत गोदामाला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दल ही आगविझविण्याचं काम पहाटेपासुन करत होते. सर्व बाजूंनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु या आगीत सहा लोकं होरपळल्याची माहिती मिळत आहे. त्यांना आगीतून बाहेर काढून उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही लोकांवर उपचार सुरू आहेत. तर काहींवर उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती मिळतेय, आग का लागली याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply