Ration Shop : रेशन दुकानात मिळणार बचत गटाची उत्पादने; धाराशिव जिल्ह्यातून पहिला उपक्रम

Dharashiva : गोरगरिबांना रेशन दुकानावर स्वस्त धान्य उपलब्ध करून दिले जाते. दार महिन्याला याचे वाटप करण्यात येत असते. मात्र आता या रेशनच्या स्वस्त धान्य दुकानात महिला बचत गटाची उत्पादने देखील उपलब्ध होणार आहेत. अर्थात बचत गटाने तयार केलेली उत्पादने रेशन दुकानावर विक्रीसाठी ठेवली जाणार आहेत. असा उपक्रम राबविणार धाराशिव जिल्हा राज्यातील पहिला ठरणार आहे.

रेशन दुकानातून रेशन कार्ड धारकांना अल्प दरात धान्य उपलब्ध करून दिले जात असते. दार महिन्याला याचे वाटप करण्यात येत असते. दरम्यान याच स्वस्त धान्य दुकानांमध्ये मिनी बँक चालवत पैसे उपलब्ध करून देण्याचा निर्णय नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यानंतर धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अनोखी संकल्पना राबवत रेशनच्या दुकानात महिला बचत गटाची उत्पादने विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Santosh Deshmukh : 'सरपंच तुला बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही'; आवादा कंपनीतील ऑफिस बॉयनं जबाबात सगळंच सांगितलं

बचत गटांना मिळणार बाजारपेठ

महिला बचत गटाकडून अनेक लघु उद्योग चालवले जातात. बचत गटांकडून तयार करण्यात येणारी उत्पादने विक्रीसाठी हक्काची अशी बाजारपेठ मिळत नसते. यामुळे उत्पादित केलेला माल विक्री होत नाही. या अनुषंगाने रेशन दुकानात या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. रेशन दुकानात वस्तू विक्रीस ठेवल्याने ग्राहकांना गुणवत्तापूर्ण माल आणि महिलांच्या हाताला काम मिळणार आहे.

राज्यातला पहिला उपक्रम

महिला सक्षमीकरणासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची अनोखी संकल्पना राबविली आहे. याला स्वस्त धान्य दुकानदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून महिला बचत गटांकडूनही जिल्हाधिकारीच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. यामुळे हक्काची बाजारपेठ आणि रोजगार वाढेल असा विश्वास महिलांना आहे. अर्थात महिला बचत गटांना स्थानिक बाजारपेठ मिळावी यासाठी राज्यभरातला पहिला उपक्रम आहे.

 
 
 
 
 
 
 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply