Dharashiv Crime : कळंब शहरात दुकानावर दरोडा; १ लाख रुपये व सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी

Dharashiv Crime : धाराशिवच्या कळंब शहरातील लक्ष्मी रोड येथील व्यापारी ब्रिजलाल भुतडा यांच्या श्री गणेश ट्रेडिंग कंपनी या दुकानाचे शटर कापून दरोडा टाकण्यात आला. यात चोरट्यांनी दुकानात असलेली १ लाख रुपयांची रोख रक्कम यासह सोने व चांदीचे दागिने लांबविल्याचे समोर आले आहे.  

धाराशिवच्या कळंब शहरातील ब्रिजलाल भुतडा यांचे दुकान आहे. रात्री दुकान बंद करून ते घरी गेल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आठ चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रकार समोर आला. दरम्यान दुकानाचे शटर गॅस कटरने कापून आठ चोरट्यानी व्यापाऱ्यांच्या दुकान व घरावर हल्ला केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान दरोडेखोरांनी एक लाख रुपये सोने चांदीचे दागिने चोरी केले असुन सीसीटीव्ही कॅमेराची तोडफोड केली आहे.  

Raosaheb Danve : भाजप ४०० हून अधिक जागा जिंकणार, काळ्या दगडावरची पांढरी रेघ; रावसाहेब दानवेंना विश्वास

तीन दरोडेखोर ताब्यात 

दरम्यान घडला प्रकाराबाबत व्यापारी ब्रिजलाल भुतडा यांनी लागलीच  पोलिसात तक्रार दिली. यानंतर नसुन व्यापारी व पोलिसांच्या प्रयत्नातून ३ आरोपींना पकडण्यात आले आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांकडून याचा तपास सुरु करण्यात आला आहे. 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *