Dharashiv : पैशांची देवाण- घेवाण करून जनतेची कामे; व्हायरल व्हिडीओने खळबळ

Dharashiv : सरकारी कार्यालयांमध्ये जनतेची कामे करण्यासाठी पैशांची देवा- घेवाण होत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. धाराशिवच्या तुळजापूर भूमी अभिलेख कार्यालयात हा प्रकार घडला असून उपअधीक्षकाचा पैसे घेतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात अली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर भूमि अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक दिलीप मोरे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काम करण्यासाठी मोरे यांनी पैसे घेतल्याचे यात दिसून येत आहे. अर्थात शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये पैशाची देवाण- घेवाण करून लोकांची काम केली जात असल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून निदर्शनास आले आहे. सदरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Beed : अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी मंदिर ट्रस्टची 'ती' घटना रद्द; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल

दरम्यान या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी पोलीस महासंचालक लाचलूचपत विभाग मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तर तुळजापूर येथील उपअधीक्षक दिलीप मोरे यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियममधील तरतुदीनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करावी; अशी मागणी धाराशिवचे माहिती अधिकार कार्यकर्ते सुभेदार यांनी केली आहे.

नगररचनाकार अधिकाऱ्यांच्या नावाने स्वीकारली ७५ हजाराची लाच बुलढाणा : शेतीची जमीन अकर्षक करून देण्याच्या नावाखाली बुलढाणा येथील नगररचनाकार विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नावाने ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शेगावातील एका सिव्हिल इंजिनियरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. प्रशांत महादेव बानोले असे या सिविल इंजिनियरचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांनी शेगावात कारवाई केली.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply