Dharangaon Crime : वाळू माफियांचा महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला; गिरणा नदीत मध्यरात्रीची घटना

Dharangaon Crime : नदी पात्रातून सध्या वाळू उपसा करण्यास मनाई आहे. तरी देखील छुप्या पद्धतीने वाळूचा उपसा करून अवैध वाळू वाहतूक सुरु आहे. अशाच प्रकारे अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. सदरची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

नदी मधून वाळू वाहतूक करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. गिरणा नदीतील वाळू उपसा करण्यासाठीचा लिलाव झाला नसल्याने नदीतून वाळू उपसा करण्यास बंदी करण्यात आलेली आहे. असे असले तरी गिरणा नदीतून मोठ्या प्रमाणात चोरून वाळूची वाहतूक करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाला न जुमानता वाळू माफिया चोरून वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक करताना दिसून येत असतात.

Pune : बसमध्ये छेड काढणाऱ्या महिलेने शिकवला धडा; सपासप २५ चापटा मारल्या; पुण्यातील VIDEO व्हायरल

रात्रीच होते वाळू वाहतूक

दिवसा वाळूची वाहतूक करता येणे शक्य नसल्याने रात्रीच्या अंधारात चोरटी वाहतूक केली जात असते. प्रामुख्याने बांभोरी, निमखेडी, आव्हाणे, चांदसर या ठिकाणाहून रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने वाळू वाहतूक करण्यात येत असते. शिवाय हि वाली वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी किंवा पोलिसांवर वाळू माफियांकडून हल्ला चढविला जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानुसारच चांदसर येथे रात्री महसूल पथकावर हल्ला करण्यात आला आहे.

जीव वाचविण्यासाठी अंधारात पळत सुटले

धरणगाव तालुक्यातील चांदसर बु. गावाच्या गिरणा नदी पात्रात हा थरार घडला आहे. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या महसूल पथकावर या वाळू माफियांनी अचानक हल्ला केल्याची खळबळजनक घटना. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर महसूल पथकातील सदस्य जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे पळत सुटले होते. या घटनेने खळबळ उडाली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply