Dhangar Reservation : धनगर समाजाच्या अंमलबजावणीचा प्रश्न महिन्याभरात निकाली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Dhangar Reservation : धनगर समाजाच्या धनगर आणि धनगड या दोन जाती एकच असल्याचा अहवाल पुढील महिन्याभरामध्ये त्यासाठी नेमलेल्या शिंदे समितीकडून सादर केला जाईल, आणि तातडीने त्यासाठी अमंलबजावणी केली जाईल असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धनगर समाजाच्या विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांच्या सोबत आज नागपुरात घेतलेल्या बैठकीत दिले.

या बैठकीला मुख्यमंत्र्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री विखे-पाटील यांच्यासह अनेक महत्त्वाचे मंत्री, धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष व धनगर समाजाचे नेते व माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यासह दीडशेहुन अधिक धनगर समाजाचे आंदोलनकर्ते, उपोषणकर्ते, पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

राज्यातील धनगर आणि धनगड या जाती वेगळ्या नसून त्या एकाच आहेत, यासाठी ही बाब मान्य करून त्यासाठी सरकारने निर्णय घेत त्यासाठी आदेश जारी करावेत या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्यांसाठी राज्यभरामध्ये धनगर समाजाच्या विविध संघटनांकडून मागील काही महिन्यांपासून आंदोलने, मोर्चे करून सरकारचे लक्ष वेधले जात आहे.

त्याच पार्श्वभूमीवर आज विधानभवन परिसरात बैठक घेण्यात आली होती. त्यात धनगर समाजाच्या या दुरुस्तीसाठी यापूर्वीच नेमण्यात आलेल्या समितीकडून यासाठीचा अहवाल महिन्याभरात सादर करण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *